tgoop.com/current_dhirajsir/33356
Last Update:
भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे 20 मे 2025 मंगळवार रोजी 95 व्या वर्षी निधन झाले.
डॉ. श्रीनिवासन हे भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले.
भारतातील पहिल्या अणुसंशोधन रिॲक्टर 'अप्सरा'च्या निर्मितीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. ते या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता होते. अणुऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मर्षी, पद्मविभूषण या नागरी सन्मानाने गौरवले होते.
१९८७ मध्ये डॉ. श्रीनिवासन यांची अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्याचबरोबर त्यांनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना केली आणि तिचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्य केले.
BY Current Affairs By Dhiraj Sir

Share with your friend now:
tgoop.com/current_dhirajsir/33356