tgoop.com/current_dhirajsir/33128
Last Update:
RBI डेप्युटी गव्हर्नर पदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती💐
केंद्र सरकारने नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्याडेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली. त्या एमडी पात्रा यांची जागा घेतील.
पूनम गुप्ता यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर आणि अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून पीएचडी केली आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अध्यापनापासून केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, आयएसआय दिल्लीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकवले. त्यानंतर IMF आणि World Bank मध्ये सामील झाल्या. तिथे सुमारे 20 वर्षे काम केल्यानंतर 2021 पासून त्या NCAER च्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या.
पूनम गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या आणि 16व्या वित्त आयोगाच्या सल्लागार समितीच्या निमंत्रक होत्या. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी मॅक्रोइकॉनॉमिक्स आणि ट्रेडवरील टास्क फोर्सचे अध्यक्षपद भूषवले.
1998 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावरील पीएचडीसाठी EXIM बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
BY Current Affairs By Dhiraj Sir

Share with your friend now:
tgoop.com/current_dhirajsir/33128