tgoop.com/current_dhirajsir/33116
Last Update:
नवीन सहकार धोरण : सुरेश प्रभू समिती
नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी श्री सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ४८ सदस्यीय राष्ट्रीय पातळीवरील समिती स्थापन करण्यात आली होती.
यामध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ, राष्ट्रीय/राज्य/जिल्हा/प्राथमिक पातळीवरील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे सचिव (सहकार) आणि आरसीएस, केंद्रीय मंत्रालये/विभागांचे अधिकारी यांचा समावेश होता.
या संदर्भात, राष्ट्रीय पातळीवरील समितीने सूचना/शिफारशी मिळविण्यासाठी देशभरात १७ बैठका आणि ४ प्रादेशिक कार्यशाळा घेतल्या.
राष्ट्रीय पातळीवरील समितीने तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय सहकार धोरणावरील मसुदा अहवाल प्राप्त झाला आहे. मसुदा धोरण तयार करण्यात आले आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे.
केंद्रीय सहकार मंत्री : अमित शहा
केंद्रीय सहकार राज्यमंत्री : कृष्ण पाल गुर्जर
केंद्रीय सहकार राज्यमंत्री : मुरलीधर मोहोळ
Very Important Point For All Competitive Exams
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
BY Current Affairs By Dhiraj Sir
Share with your friend now:
tgoop.com/current_dhirajsir/33116