tgoop.com/MPSCExamNotes/31730
Last Update:
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - विसर्ग संधी
पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.
विसर्ग संधी
१) विसर्ग उकार संधी
विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो व तो मागील 'अ' मध्ये मिसळून त्याचा 'ओ' होतो.
नोट: या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो.
उदा.
यशः + धन = यशोधन
मनः + रथ = मनोरथ
अधः + वदन = अधोवदन
तेजः + निधी = तेजोनिधी
मनः + रंजन = मनोरंजन
तपः + बल = तपोबल
मनः + राज्य = मनोराज्य
रजः + गुण = रजोगुण
यशः + गिरी = यशोगिरी
२) विसर्ग र् संधी
विसर्गाच्या मागे 'अ/आ' खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा 'र्' होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते.
उदा.
निः + अंतर = निरंतर
दुः + जन = दुर्जन
बहिः + अंग = बहिरंग
दुः + आत्मा = दुरात्मा
निः + विकार = निर्विकार
धनुः + विद्या = धनुर्विद्या
निः + इच्छा = निरिच्छा
निः + लोभ = निर्लोभ
३) विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असून पुढे 'क, ख, प, फ' हे वर्ण आले तर विसर्गाचा 'ष्' होऊन संधी होते.
उदा.
निः + कर्ष = निष्कर्ष
दुः + काळ = दुष्काळ
निः + कारण = निष्कारण
निः + पाप = निष्पाप
निः + फळ = निष्फळ
निः + कपट = निष्कपट
दुः + कीर्ती = दुष्कीर्ती
बहिः + कृत = बहिष्कृत
दुः + परिणाम = दुष्परिणाम
बहिः + कार = बहिष्कार
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
४) विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे 'क, ख, प्, फ्' ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो.
उदा.
रजः + कण = रजःकण
प्रातः + काल = प्रातःकाल
अधः + पात = अधःपात
इतः + पर = इतःपर
तेजः + पुंज = तेजःपुंज
इतः + उत्तर = इतउत्तर
अतः + एव = अतएव
५) पदाच्या शेवटी 'र्' येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास 'र्' चा विसर्ग होतो.
उदा.
अंतर् + करण = अंतःकरण
चतुर् + सूत्री = चतुःसूत्री
६) पहिल्या पदाच्या शेवटी 'स्' येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो. Join @Marathi_Grammar
उदा.
मनस् + पटल = मनःपटल
तेजस् + कण = तेजःकण
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
७) विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या 'र्' च्या मागे 'अ' व पुढे मृदू वर्ण आल्यास तो 'र्' तसाच राहून संधी होते.
उदा.
पुनर् + जन्म = पुनर्जन्म
अंतर् + आत्मा = अंतरात्मा
अंतर् + गत = अंतर्गत
पुनर् + उक्ती = पुनरुक्ती
पुनर् + उच्चार = पुनरुच्चार
८) विसर्गाच्या पुढे 'च् / छ' आल्यास विसर्गाचा 'श्' होतो. 'त् / थ्' आल्यास 'स्' होतो.
उदा.
निः + चल = निश्चल
दुः + चिन्ह = दुश्चिन्ह
मनः + ताप = मनस्ताप
निः + तेज = निस्तेज
मनः + चक्षु = मनश्चक्षु
९) विसर्गाच्या पुढे 'कृ' धातूची रूपे असल्यास विसर्गाचा 'स्' होऊन संधी होते.
Join @Marathi_Grammar
उदा.
नमः + कार = नमस्कार
पुरः + कार = पुरस्कार
वयः + कर = वयस्कर
१०) विसर्गाच्या पुढे:
- च, छ आल्यास → विसर्गाचा श् होतो
- ट, ठ आल्यास → विसर्गाचा ष् होतो
- त, थ आल्यास → विसर्गाचा स् होतो
उदा.
अधः + तल = अधस्तल / अधःस्थल
शनैः + चर = शनैश्चर
अधः + छवि = अधश्छवि
चक्षुः + तेज = चक्षुस्तेज
रामः + टीकते = रामष्टीकते
११) विसर्गाच्या पुढे श्, स्, ष् आल्यास विसर्ग कायम राहतो.
उदा.
दुः + शासन = दुःशासन
निः + स्वार्थी = निःस्वार्थी
निः + संदेह = निःसंदेह
निः + संशय = निःसंशय
निः + शेष = निःशेष
१२) विसर्गाच्या मागे इ / उ असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो; परंतु पुढे पुन्हा र् आल्यास मागील र् चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. Join @Marathi_Grammar
उदा.
निः + रव = नीरव
निः + रस = नीरस
📌 संस्कृत संधी व निव्वळ मराठी संधी तुलना:
- मंत्र + आलय = मंत्रालय
- मंत्री + आलय = मंत्रालय
- एक + ऊन = एकोन
- एक + ऊन = एकूण
- एक + एक = एकैक
- एक + एक = एकेक
- किती + एक = कित्येक
- किती + एक = कितीक
⭐ वैशिष्ट्यपूर्ण संधी:
अ / आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स् आल्यास, स् चा ष् होतो.
उदा.
अनु + संग = अनुषंग
📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.
BY MPSC स्पर्धामंत्र - मी अधिकारी होणारच
Share with your friend now:
tgoop.com/MPSCExamNotes/31730